अशोका युनिव्हर्सल (वडाळा) संघाने रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलचा १३ धावांनी पराभव करत येथे आयोजित रासबिहारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.
रासबिहारी स्कूलच्या वतीने आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा विभागाचे उपसंचालक जगन्नाथ अधाने, जिल्हा क्रीडा अधिकारी सुधीर मोरे, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव समीर रकटे, रासबिहारी स्कूलच्या विश्वस्त सुचित्रा सारडा, प्राचार्य बिंदू विजयकुमार आदी उपस्थित होते. रासबिहारी स्कूलचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उद्गार मान्यवरांनी काढले.
याप्रसंगी विजेता अशोका व रासबिहारी या संघांसह मालिकावीर म्हणून अनिरुद्ध पवार, सर्वोत्कृष्ट गोलंदाज कुणाल राठोड, फलंदाज केतन टंख यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या अनुष्का सराफ व दुर्वा गांधी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार वेदांत गायकवाड यांनी मानले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Dec 2012 रोजी प्रकाशित
अशोका युनिव्हर्सल आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत विजेते
अशोका युनिव्हर्सल (वडाळा) संघाने रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलचा १३ धावांनी पराभव करत येथे आयोजित रासबिहारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.
First published on: 25-12-2012 at 01:39 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashoka universal wins the inter school cricket competition