दिवाळीनिमित्त घेण्यात आलेल्या शिव वैभव किल्ले स्पर्धेत शिवकिल्ला गटात अतुल गुरू यांच्या ‘पन्हाळगड’ तसेच शिवगौर ग्रुपच्या ‘रायगड’ किल्ल्याला संयुक्तपणे प्रथम क्रमांक देण्यात आला.  वैदर्भीय किल्ला गटात भांडे प्लॉट्समधील नंदीवर्धन किल्ल्याला व काल्पनिक गटात गांधीनगरातील मॉडर्न स्कूलला विशेष पुरस्कार देण्यात आला.
स्पर्धेच्या निमित्ताने शिवकालीन, वैदर्भीय किल्ले व काल्पनिक अशा तीन वर्गवारीत एकूण ७० किल्ले तयार करण्यात आले होते. या किल्ल्याचे नुकतेच मूल्यांकन करण्यात आले. डॉ. दत्तात्रय सोनेगावकर, शुभांगी मुळे आणि प्रा. विजय घुगे यांनी परीक्षक म्हणून काम बघितले. शिवकिल्ला गटात बेसा भागातील चंडिका नगरातील ‘देवगिरी’ किल्ल्याला विशेष पुरस्कार देण्यात आला. याच गटात श्रीकांत गडकरी व प्रकाश जिल्हारे यांनी सक्करदरा भागात तयार केलेल्या सिंधूदुर्ग किल्ल्याला द्वितीय तर बाबुळखेडा भागात विशाल देवकरने तयार केलेल्या रायगड किल्ल्याला तृतीय क्रमांक देण्यात आला. बी आर. ए. मुंडले हायस्कूमधील सिंधुदूर्ग किल्ल्याला, स्वावलंबी नगरातील शिवनेरी किल्ला, स्वप्नील मूर्तेनेच्या शिवनेरी किल्ला, गणेशपेठमधील अंजिक्य साठेच्या राजगड किल्ला , बी आर ए मुंडले शाळेतील प्रतापगड, सोनेगावमधील जयदुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तयार केलेला सिंधुदुर्ग आणि नितीश ठाकरे व त्याच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या जंजिरा किल्ल्याला प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.  वैदर्भीय किल्ले गटात भांडे प्लॉटसमधील अष्टक ग्रुपने तयार केलेल्या ‘नंदिनीवार्धन किल्लाला प्रथम, प्रसादनगरातील राघवेंद्र टोकेकरच्या रामटेकमधील रामगिरी किल्ल्याला द्वितीय, संजय गांधी नगरातील शुभम राचलवारच्या नगरधन किल्ल्याला तिसरा क्रमांक देण्यात आला. काल्पनिक किल्ला गटात गांधीनगरातील वाल्मिकीनगर हिंदी प्राथ. शाळेला प्रथम, भरतनगरातील शिव सिद्धार्थ ग्रुपला द्वितीय, रामदासपेठमधील अविनाश आणि आकाश अग्रवाल यांनी तयार केलेल्या किल्ल्याला तृतीय क्रमांक देण्यात आला. कमलताई परांजपे बालमंदिर, आकाश मरसकोल्हे व सहकारी, संचयनी कॉम्पलेक्स स्वावलंबीनगर, मुंडले पब्लिक स्कूल गवसी मानापूर, मंगेश बारसागडे खानखोजेनगर, सोहम अपराजित, लाडीकर ले आऊट, प्रतीक पत्राळे, महाल, आश्लेषा कावळे, चंदननगर, भूषण मयंक, शालिक नेवारे- भेंडे ले आऊट, देवनगर मित्र मंडळ, अभिनव क्लसिक ग्रुप -लक्ष्मीनगर यांनी तयार केलेल्या वैदर्भीय काल्पनिक यांना प्रोत्साहन बक्षिस देण्यात आले. महिलांमध्ये नरेंद्रनगरातील मंजूषा पाटील, ज्येष्ठ नागरिकांमध्ये ओंकारनगरातील दिलीप इंदूरकर, अमराठी स्पर्धेकांमध्ये कोमल सलुजा व सहकारी यांना प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात आली. किल्ला परीक्षणासाठी रमेश सातपुते, विपीन सिरसकर, प्रवीण गावंडे व जयंत तांदूळकर यांनी सहकार्य केले.