राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुरू असलेल्या उन्हाळी परीक्षेदरम्यान बी.कॉम. पेपरच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला. सीए होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयपीसीसीची परीक्षा असते. या परीक्षांच्या तारखा एकाच दिवशी आल्यामुळे बी.कॉम.चे प्रथम वर्ष व अंतिम वर्षांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून एकूण तीन पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. बी.कॉम प्रथम वर्ष आणि अंतिम वर्षांचे पेपर अनुक्रमे ११मे आणि ६ मे रोजी होणार होते. आता हे पेपर २४ मे आणि २३ मे रोजी होतील. बी.कॉम.(कॉम्प्युटरअ‍ॅप्लिकेशन) प्रथम वर्षांचा पेपर उद्या, शुक्रवारी होता तो आता येत्या २० मे रोजी होणार आहे. लेखी परीक्षा आणि इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटन्स कोर्सच्या(आयपीसीसी) परीक्षांच्या तारखा एकाच दिवशी आल्याची अधिसूचना विद्यापीठातर्फे काढण्यात आली. त्यानुसार नवीन तारखादेखील विद्यापीठाने घोषित केल्या.  उन्हाळी परीक्षांच्या २३ मार्चपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील ४८ परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या मात्र, विद्यार्थी संघटनांच्या दबावामुळे त्या पुनस्र्थापित करण्यात आल्या. त्यात बी.कॉम. भाग एक व अंतिम वर्षांचा समावेश होता. हे दोन्ही पेपर याच महिन्यात होणार आहेत.