शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थिकलशाचे बुधवारी जिल्ह्य़ात आगमन झाले. सकाळी उजनी येथे शिवसैनिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. त्यानंतर आशीव, बेलकुंड मोड, बोरफळमार्गे औसा येथे माजी आमदार दिनकर माने यांच्या संपर्क कार्यालयात अस्थिकलश ठेवला होता. तेथून बुधोडा, पेठ, वासनगाव, गंगापूर, खंडापूर, हरंगुळ मार्गे मुरूड, तांदुळजा, गाटगाव, जेवळी, नागझरी, बोरवटी, लातूर येथील शिवसेनेच्या शहर संपर्क कार्यालयात अस्थिकलश आणण्यात आला. प्रत्येक ठिकाणी शिवसैनिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. उद्या (गुरुवारी) सकाळी लातूर व निलंग येथे अस्थिकलश जाणार असून शुक्रवारी (दि. २३) रेणापूर तालुक्यात अस्थिकलशाचे विसर्जन केले जाणार आहे. गेल्या ४५ वर्षांपासून शिवसेनेत कधी न कधी राहिलेले शिवसैनिक मनोभावे अस्थिकलशाचे दर्शन घेत असतानाचे चित्र अनेक गावात दिसून आले.