वसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश शहरात सकाळी दाखल झाला. जिल्ह्य़ात दोन अस्थिकलश आणले असून, येथील छत्रपती शिवाजीमहाराज पुतळय़ाजवळ अस्थिकलशाचे दर्शन घेण्यास शिवसैनिकांसह नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.
खासदार गणेश दुधगावकर, आमदार संजय जाधव व मीरा रेंगे, सहसंपर्कप्रमुख डॉ. शिवाजी दळणर, जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, सुधाकर खराटे आदींनी दर्शन घेतले. वसमत रस्त्यावरील शिवाजी महाविद्यालयाजवळ दुपारी कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला. येथेही अनेकांनी दर्शन घेतले.
अजित वरपुडकर, संजय गाडगे, सखुबाई लटपटे, सोनाली देशमुख, अनिल डहाळे, संदीप भंडारी आदींसह शिवसैनिक या वेळी उपस्थित होते. अस्थिकलश तीन दिवस जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागात जाणार असून, शुक्रवारी गंगाखेड व मुद्गल येथे त्याचे विसर्जन होणार आहे.