शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थींचे जिल्ह्य़ातील गंगाखेड व मुगदल येथे गोदावरी नदीपात्रात शुक्रवारी विसर्जन करण्यात आले. जिल्ह्य़ात दोन अस्थिकलश दर्शनासाठी आणण्यात आले होते. एक जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांच्याकडे, तर दुसरा परभणी व गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे सुधाकर खराटे यांच्या स्वाधीन होता. जाधव यांनी मानवत, पाथरी, पोखर्णी, सोनपेठ येथे अस्थिकलश दर्शनासाठी उपलब्ध करून दिला.
मुगदल येथे अस्थिकलश आणण्यात आला. रामराव ढोकमहाराज यांच्या कीर्तनानंतर अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात आले. दुसरा अस्थिकलश गंगाखेड येथे विसर्जनासाठी आणला. गोदावरी नदीच्या वैष्णवीघाटापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
या वेळी विजयानंद महाराज सुपेकर व अमृत महाराज जोशी बीडकर यांचे कीर्तन झाले. यासमयी शिवसेनेच्या अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. शिवसेनेच्या वतीने यावेळी गो दान करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Nov 2012 रोजी प्रकाशित
बाळासाहेबांच्या अस्थींचे गोदावरीपात्रात विसर्जन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थींचे जिल्ह्य़ातील गंगाखेड व मुगदल येथे गोदावरी नदीपात्रात शुक्रवारी विसर्जन करण्यात आले. जिल्ह्य़ात दोन अस्थिकलश दर्शनासाठी आणण्यात आले होते.

First published on: 24-11-2012 at 12:40 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb bone pitcher immersion in godavari river