दुष्काळी परिस्थितीची पाहणी व कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे यांचा जिल्हा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यांच्या लोणी येथील कार्यालयातून ही माहिती देण्यात आली.
दि. १९ला कर्जत, दि. २०ला पाथर्डी, दि. २१ला जामखेड, दि. २२ला नगर तालुका, दि. २६ला शेवगाव, दि. २७ला नेवासे, दि. २८ला श्रीरामपूर व श्रीगोंदा या प्रमाणे हा दौरा आयोजित करण्यात आला होता. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे हा दौरा रद्द करण्यात आला.