लांडे खून प्रकरण
अशोक लांडे खून प्रकरणातील प्रमुख आरोपी भानुदास कोतकर याचा जामीन अर्ज आज सत्र न्यायालयाने फेटाळला. पत्नी सुरेखा यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात बायपास शस्त्रक्रिया करायची असल्याने, तिच्याजवळ थांबणे आवश्यक आहे, असे कारण देत कोतकरने नव्याने जामीन अर्ज दाखल केला होता. यापुर्वी त्याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने नाकारला होता तर उच्च न्यायालयातून मागे घेतला होता.
कोतकरने वकिल निर्मल सावळे (बुलढाणा) यांच्यामार्फत अर्ज सत्र न्यायालयापुढे दि. २० रोजी सादर केला होता व त्यात पत्नीवरील शस्त्रक्रिया दि. २१ रोजी होणार असल्याचे नमुद केले होते. न्यायालयाने कोतवाली पोलीस व सरकारी वकिलांना म्हणने सादर करण्यास सांगितले होते. जिल्हा सरकारी वकिल सतीश पाटील यांनी जामिनास विरोध दर्शवताना शस्त्रक्रिया होऊन गेली असल्याने आता हा अर्ज निर्थक ठरत आहे, डॉक्टरांच्या प्रमाणपत्रानुसार सुरेखा यांची प्रकृतीस धोका नाही, तसेच रूग्णालयातही त्यांच्याजवळ एकालाच थांबता येणे शक्य होणार आहे, गुन्ह्य़ाचे गांभीर्य लक्षात घेता अर्ज मंजूर करु नये, याच गुन्ह्य़ातील आणखी एक आरोपी ढवण यानेही आईच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता, तो अन्य न्यायालयाने नाकारला, त्यामुळे कोतकरच्या अर्जाचा विचार करता येणार नाही, अशी बाजू मांडत सरकारी वकिल पाटील यांनी विरोधासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले.
गुन्ह्य़ातील मुळ फिर्यादी शंकरराव राऊत यांनीही वकिल पाटील यांच्यामार्फत लेखी विरोध
सादर केला. कोतकरने अद्यापि पारपत्र पोलिसांकडे जमा केले नसल्याने जामीन मिळाल्यानंतर तो परदेशात जाऊ शकतो याकडे लक्ष त्यांनी लक्ष वेधले.