दोन दिवसांपूर्वी राधानगरी तालुक्यात झालेल्या खूनप्रकरणी मृताच्या भावास बुधवारी पोलिसांनी अटक केली. दारू पिऊन लोकांना त्रास देण्याच्या प्रवृत्तीला कंटाळून भावाचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. महेश महादेव माळी (वय २४, रा.मंगळवार पेठ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
१७ जून रोजी पिरळ गावाच्या ओढय़ामध्ये एका व्यक्तीचा खून केल्याचे उघडकीस आले होते. पोलीस तपासात योगेश महादेव माळी (वय २८) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे निष्पन्न झाले होते. वृत्तपत्रातील बातमी वाचून मृत व्यक्तीचा भाऊ महेश माळी याने मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी केला होता. गवंडी काम करणाऱ्या योगेश माळीचे कोणाशीही वैर नसल्याने कुटुंबातील लोकांनी कोणावरही संशय व्यक्त केला नव्हता. तथापि पोलिसांनी त्याच्या भावावर तपासाची दिशा ठेवली. त्याला पोलीशी खाक्या दाखविल्यानंतर खून केल्याची कबुली दिली. १६ जून रोजी महेशने भाऊ योगेश याला राधानगरीला बहिणीकडे जायचे आहे, असे सांगून दुचाकीवरून सोबत नेले. रस्त्यामध्ये योगेशला दारू पाजली. पिरळ गावाजवळ आले असता योगशला महेशने ओढय़ात ढकलले. योगेशचे डोके, हणुवटी, कपाळ यावर दगड मारून खून केला.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jun 2013 रोजी प्रकाशित
राधानगरीतील खूनप्रकरणी मृताच्या भावास अटक
दोन दिवसांपूर्वी राधानगरी तालुक्यात झालेल्या खूनप्रकरणी मृताच्या भावास बुधवारी पोलिसांनी अटक केली. दारू पिऊन लोकांना त्रास देण्याच्या प्रवृत्तीला कंटाळून भावाचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे

First published on: 20-06-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brother arrested of dead in murder case of radhanagari