शहराच्या तिडके कॉलनीतील राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित ‘किल्ले बनवा’ स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संस्थेच्या वतीने दरवर्षी ही स्पर्धा घेण्यात येते. तसेच सुटीमध्ये अन्य विविध स्पर्धा, खेळ, शिबीर, स्पर्धा परीक्षांचे आयोजन, उंचीवाढ वर्ग, तज्ज्ञ वक्तयांचे व्याख्याने, योगासन, सुसंस्कार शिबीरांचे आयोजन केले जाते.
स्पर्धेत संस्थेचे कार्यकारी सभासद प्रायोजक सचिन आडगावकर यांनी प्रथम बक्षीस आर्यन देशमुख, द्वितीय आयुषी तांबट, तृतीय केतकी कापडणीस व उत्तेजनार्थ रिवा, शर्वरी चंद्रात्रे, दुष्यंत देवरे, समृध्द चौधरी, ओंकार कस्तुरे यांना संस्थापक मेजर सुधाकर पिसोळकर, डी. एम. कुलकर्णी आदींच्या हस्ते देण्यात आले. संयोजन विनायक येवले यांनी केले.