साक्रीमध्ये उद्या जिल्हा परिषदेच्या तीन जागांसाठी पोटनिवडणूक

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार जागांची पोटनिवडणुकीत मांजरी गटातून उमेदवार बिनविरोध निवडून आले असले तरी मालपूर, कासारे, सामोडे या तीन ठिकाणी २३ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे.

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार जागांची पोटनिवडणुकीत मांजरी गटातून उमेदवार बिनविरोध निवडून आले असले तरी मालपूर, कासारे, सामोडे या तीन ठिकाणी २३ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे.
मांजरी गटातून विलास बिरारीस यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित तिन्ही ठिकाणी दुरंगी, तिरंगी लढती होणार आहेत. सामोडे गटातून राष्ट्रवादीतर्फे रंजना घरटे उमेदवारी करीत असून, काँग्रेसतर्फे तनुजा क्षीरसागर आहेत. मालपूर गटात काँग्रेसचे उमेदवार तात्या भिल, राष्ट्रवादीचे श्यामराव व्याहीच, भाजप उमेदवार साहेबराव भोये यांच्यामध्ये लढत होणार आहे. कासारे गटातून राष्ट्रवादीतर्फे जयश्री अहिरे, काँग्रेसतर्फे रेश्मा सोनवणे, भाजपकडून राजस ठाकरे यांच्यात लढत आहे. या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांमध्ये खरी चुरस आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Byelection for three zp seats in sakri on tomorrow

Next Story
केवळ ‘अर्जुन’ विजेत्यांनाच राजधानी, शताब्दीमधून मोफत प्रवास
ताज्या बातम्या