यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला असून २ जूनलाही निवडणूक होणार आहे.
काँग्रेस आमदार निलेश पारवेकर यांचे २७ जानेवारीला अपघाती निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. ४ ते १५ मे या कालावधीत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, तर १६ तारखेला उमेदवारी अर्जाची छाननी होईल. १७ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. प्रत्यक्ष मतदान २ जून रोजी होणार असून ५ जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी शुक्रवारी येथील वार्ताहर परिषदेत दिली. यवतमाळ जिल्ह्य़ात शुक्रवारपासून निवडणूक आचारसंहिता देखील लागू करण्यात आल्याचे मुदगल यांनी सांगितले. वार्ताहर परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा उपस्थित होते.