शहापूर तालुक्यातील नडगाव येथील किसान हायस्कूलमधील शिक्षकाच्या
आत्महत्येप्रकरणी याच शाळेत शिकविणाऱ्या सात शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून शहापूर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी अद्याप फरार आहेत.
येथील किसान हायस्कूलमधील शिक्षक दत्तात्रय भांडे यांनी २५ डिसेंबर रोजी विषप्राशन करून आत्महत्या केली होती. शाळेतील सहकर्मचाऱ्यांचा त्रासाला कंटाळूनच आपल्या पतीने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या पत्नी आशा यांनी तक्रारीत केला आहे. कोणताही दोष नसताना आपल्या पतीवर कॅटलॉग हरविल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. याआरोपावरून त्यांना सतत मानसिक त्रास देण्यात येत होता. मद्यपान करीत असतानाचे फोटो दाखवून त्यांना बदनाम करण्याची धमकी दिली जात होती, असाही आरोप त्यांच्या पत्नी आशा यांनी केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jan 2013 रोजी प्रकाशित
शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल
शहापूर तालुक्यातील नडगाव येथील किसान हायस्कूलमधील शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी याच शाळेत शिकविणाऱ्या सात शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून शहापूर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी अद्याप फरार आहेत.
First published on: 09-01-2013 at 12:57 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case on seven suspect for teacher suside case