राज्याचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर होताच नागपूरसह त्यांचे आजोळ असलेल्या मूल शहरात पंचमीला फटाके फोडून आनंदोत्सवाची दिवाळी साजरी करण्यात आली. ५० वषार्ंपूर्वी मूलचे मा.सा. कन्नमवार मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर मूल येथील फडणवीस कुटुंबातील देवेंद्र मुख्यमंत्री होत असून याच मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिले. विशेष म्हणजे, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यात महत्वाची भूमिका सरसंघचालक मोहनजी भागवत यांची राहिली आहे. ही सर्व कर्तृत्ववान मंडळी चंद्रपूर जिल्ह्य़ातील, हा अनोखा योगायोग आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे पणजोबा अमृतराव फडणवीस हे मूलचे मालगुजार होते. देवेंद्र यांचे आजोबा काशीराव यांना दोन पत्नी होत्या. त्यांच्यापासून नऊ अपत्ये झाली. त्यातील गंगाधरपंत एक, हे देवेंद्र यांचे वडील. गंगाधरपंत यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मूल येथेच झाले. शिक्षणानंतर ते १९६५ दरम्यान नागपूर येथे स्थायिक झाले. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म नागपूरला झाला. मात्र, आजोळी मूल येथे त्यांनी आपले बालपण घालविलेले आहे. त्यांचे अनेक बालमित्र आजही मूल येथे आहेत. फडणवीस कुटुंबाची शेती मूलमध्येच आहे. शेती पाहण्यासाठी किंवा काकू आमदार शोभा फडणवीस यांना भेटण्यासाठी ते अनेकदा मूल येथे येत असतात. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे आजोळ मूलशी नाते आणखी घट्ट होईल, असा विश्वास या येथील लोकांना आहे.
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र यांच्या नावाची घोषणा होताच फडणवीस वाडय़ात फटाके फोडून आनंदोत्सवाला उधाण आले होते. फडणवीस कुटुंबीय, तसेच मूल व परिसरातील लोकांनी वाडय़ावर एकत्र येऊन पंचमीच्या दिवशी दिवाळीचा आनंद साजरा करतांना जुन्या आठवणींना उजाळा दिला, तसेच यावेळी सर्वाना मिठाई व साखर वाटून तोंड गोड करण्यात आले. ५० वर्षांंपूर्वी म्हणजे २० नोव्हेंबर १९६२ रोजी मूलचे सुपुत्र मा.सा.कन्नमवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. तेव्हाही दिवाळी नुकतीच संपलेली होती. तेव्हा कन्नमवार यांच्या नावाची घोषणा होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. आताही ५० वर्षांंनंतर मूलशी संबंधित देवेंद्र यांच्या नावाची घोषणा होताच फटाक्यांच्या आतिशबाजीचा बार उडाला आहे.
विशेष म्हणजे, देवेंद्र यांच्या नावाला याच विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अनुमोदन दिले आहे. मा.सा. कन्नमवार, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार ही तिन्ही नावे मूलशी संबंधित असणे, हा योगायोग आहे. देवेंद्र यांच्यापूर्वी मुनगंटीवार प्रदेशाध्यक्ष होते, हाही एक योगायोगच आहे. फडणवीस एक अभ्यासू व अजातशूत्र व्यक्तीमत्व म्हणून सर्वाना परिचित आहेत. त्यामुळे काल आनंदोत्सव साजरा होत असतांना सर्वपक्षीय कार्यकर्ते आतिषबाजी करीत असल्याचे चित्र प्रथमच येथे बघायला मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या आजोळातील हा आनंदोत्सव आज सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असून चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्य़ातील भाजप कार्यकर्त्यांनीही मिठाई वाटप करून दिवाळी साजरी केली. विशेष म्हणजे, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात महत्वाची भूमिका सरसंघचालक मोहनजी भागवत यांची राहिलेली आहे. भागवत हे सुध्दा मूळचे चंद्रपूरचे रहिवासी आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांना आशीर्वाद देणारे मोहनजी एकाच जिल्ह्य़ातील म्हणजे, चंद्रपूरचेच, हाही अनोखा योगायोगच आहे.

Narendra Modi and Raj Thackeray Meeting in Kalyan
कल्याणमध्ये नरेंद्र मोदी, राज ठाकरे यांच्या सभा
Shivsena Thackeray group,
उपमुख्यमंत्र्यांना सभेपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून पनवेलकरांच्यावतीने पाच प्रश्न
lok sabha election 2024 cm eknath shinde road show in thane for naresh mhaske s campaign
मुख्यमंत्री शिंदे यांचे बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शन; नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी ठाण्यात ‘रोड शो
v shriniwas
भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री व्ही श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, गेल्या चार दिवसांपासून होते आयसीयूत दाखल!
Chief Minister Eknath Shindes rally to campaign for Mahayuti candidate Rajshree Patil Mahale
भर उन्हात मुख्यमंत्र्याचे जय श्रीराम, जय हनुमान…
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत