साकेत येथील ठाणे पोलीस आयुक्तालय क्रीडा संकुलावर २५ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा सुरू असून त्यामध्ये महिला तसेच पुरुषांची क्रॉस कन्ट्री स्पर्धा शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेकरिता ठाणे वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतुकीत मोठे बदल केले असून त्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.
उद्या, शुक्रवारी पहाटे ५ ते सकाळी ११ वाजेपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत. कापूरबावडी येथून वसंत विहार व गांधीनगर चौक मार्गे डॉ. काशीनाथ घाणेकर – खेवरा सर्कल – टिकूजीनीवाडी सर्कलकडे जाणाऱ्या मार्गामध्ये हे बदल करण्यात आले आहेत. तसेच वसंतविहार-गांधीनगर चौक- लोक हॉस्पीटल-डॉ.काशीनाथ घाणेकर नाटय़गृह-खेवरा सर्कल-टिकूजीनीवाडी-निळकंठ ग्रीन-शिवाईनगर नाका- सर्कल-उपवन-बेथनी रुग्णालय या रस्त्यावर नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे, असे वाहतूक पोलिसांनी कळविले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2013 रोजी प्रकाशित
क्रॉस कन्ट्री स्पर्धेसाठी शहरातील वाहतुकीत बदल
साकेत येथील ठाणे पोलीस आयुक्तालय क्रीडा संकुलावर २५ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा सुरू असून त्यामध्ये महिला तसेच पुरुषांची क्रॉस कन्ट्री स्पर्धा शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेकरिता ठाणे वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतुकीत मोठे बदल केले असून त्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.
First published on: 11-01-2013 at 01:43 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Change in traffice for cross country competition