आमगाव तालुक्यातील पाउलदौना येथील ५ वर्षीय बालक २८ जानेवारीपासून बेपत्ता आहे. त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेऊनही त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. यावरून तालुक्यात लहान मुले पळविणारी एखादी टोळी सक्रिय तर नाही ना, अशा चर्चाना उधाण आले आहे.
या संदर्भात कुटुंबीयांनी आमगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कुणाल विजय सोनवाने, असे त्या बेपत्ता असलेल्या मुलाचे नाव आहे. २८ जानेवारी रोजी कुणाल आपल्या सायकलने गावात फिरत असतांना अनेक गावकऱ्यांनी पाहिले होते, परंतु सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अचानक तो बेपत्ता झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांनी गावात, नातेवाईकांकडे, गावाशेजारच्या परिसरात शोधाशोध केली तरी त्याचा थांबपत्ता लागला नाही. मुख्य म्हणजे, फिरत असलेल्या सायकलसह तो बेपत्ता असल्याने कुणी त्याचे अपहरण तर केले नाही ना, असा प्रश्नही निर्माण होत आहे.
आमगाव तालुका महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर असल्याने एखादी आंतरराज्यीय मुले पळविणारी टोळी या परिसरात सक्रिय असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी कुणालच्या कुटुंबीयांनी आमगाव पोलिसात तक्रार दाखल केली असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
 आसोली शाळेचा विद्यार्थी बेपत्ता
आसोली येथील सुदामा हायस्कुलचा दहावीचा विद्यार्थी शुभंम नरेंद्र बिसेन हा शाळेत जातो म्हणून मंगळवार २५ जानेवारीपासून घराबाहेर पडला, मात्र तो अद्याप घरी परतलेला नाही. तो शाळेतही पोहोचलेला नाही.