स्वत:च्या दोन लहान मुलांचा गळा चिरून निर्घृण खून करणाऱ्या नराधम पित्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. दरम्यान, या नराधमाचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय वसमतच्या वकील संघाने घेतला आहे. आरोपी सय्यद वहाब स. मीर यास पोलिसांनी वसमत न्यायालयासमोर उभे केले असता त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी शहरातील नागरिकांनी या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. दरम्यान, या घटनेचा सर्वच स्तरातील नागरिकांनी तीव्र निषेध केला. आरोपीस फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रपतीला पाठविले. यावर शेकडो नागरिकांच्या सह्य़ा आहेत.