एड्स, एचआयव्हीबाधित चिमुकल्यांना काही क्षण आनंदाचे मिळावे व त्यांच्या चेहऱ्यावरही हास्य उमलावे, या हेतूने जागतिक एड्सदिनानिमित्त आस्था जनविकास संस्थेतर्फे या मुलांसाठी आगळावेगळा उपक्रम राबविला गेला. या वेळी अवतरलेल्या मिकी माऊससोबत चिमुकल्यांनी नाच, गाणे गाऊन धमाल केली.
श्री बाबासाई बहुद्देशीय सेवाभावी संस्थेंतर्गत चालवल्या जाणाऱ्या धर्मवीर राजे संभाजी एड्सग्रस्त मुला-मुलींच्या बालगृहात हा कार्यक्रम झाला. ज्योतीनगर येथील आस्था जनविकास संस्थेने एड्स आणि एचआयव्हीबाधित चिमुकल्यांसाठी आयोजित या उपक्रमांतर्गत मुलांचे आवडते कार्टून पात्र मिकी माऊस अवतरले. बालगृहातील मुलांनी त्याच्यासोबत नृत्य केले, गाणे म्हटले. मिकी माऊसनेही मुलांना फुगे, छोटी भीमचे मास्क, चॉकलेट व भेटवस्तू दिल्या. मिकी माऊसने काही मुलांना कडेवर घेऊन हसवले. महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्ष अॅड. रेणुका घुले, बालगृहाचे अध्यक्ष नितीन वाकुडे, अधीक्षक मनोज वाकुडे यांचा सत्कार करण्यात आला