२१ हजार किमी अंतरावरून ४१ उल्का जाणार असल्याने मोठा धोका
दरवर्षी पृथ्वीजवळून जाणारी ४५ मीटर व्यासाची व एक लाख ३० हजार मेट्रिक टनाची २०१२ डीए-१४ नावाची मोठी अश्नी (अॅस्टेराईड) येत्या १५ फेब्रुवारीला पृथ्वीच्या अगदी जवळून म्हणजे २१ हजार किमी अंतरावरून जाणार असल्यामुळे अवकाशातील एखाद्या उपग्रहाशी टक्कर होण्याची दाट शक्यता असून तिचा मार्ग बदलल्यास ती पृथ्वीवरही आदळण्याची भीती आहे.
२०१२ डीए-१४ ही अॅस्टेराईड मागील वर्षी २२ फेब्रुवारीला साग्रा, स्पेन येथील ओएएम ऑब्झरव्हेटरी येथून शोधली गेली होती. ही उल्का दरवर्षी पृथ्वी व चंद्राच्या मधुन कमी अधिक अंतरावरून जात असते परंतु यावर्षी ती सर्वात कमी म्हणजे २१ हजार किमी अंतरावरून जाणार असल्याने मोठा धोका होण्याची शक्यता खगोल वैज्ञानिक व्यक्त करीत आहे. नासाजवळ १९१८ ते १९२६ व १९९७ ते २०१३ पर्यतची या उल्केची नोंद आहे. त्यानुसार मागील वर्षी ही उल्का १ लाख ८० हजार किमी अंतरावरून गेली होती. परंतु, यावर्षी ती सर्वात कमी अंतरावरून जाणार आहे.
नासाने ही उल्का उपग्रहांवर आदळण्याची शक्यता व्यक्त केली असून पृथ्वीवर आदळण्याची शक्यता १ टक्के आहे. मात्र, जगातील इतर वैज्ञानिक ही उल्का २५ टक्के पृथ्वीवर आदळण्याची व्यक्त करीत आहेत. इतक्या जवळून जाणाऱ्या उल्केला पृथ्वीच्या गुरूत्वाने ओढले तर निश्चित पृथ्वीवर आदळून २०० स्के. किमी भुभाग क्षणात नष्ट करून टाकू शकते. ही उल्का जमिनीवर पडल्यास २.४ मेगा टन टीएनटी इतकी अणुबॉम्बसदृश्य ऊर्जा बाहेर टाकेल व सायबेरिया देशातील तुंगस्का येथे ३० जून १९०८ रोजी अशीच मोठी उल्का पडून ७०० चौरस किमी जंगल क्षणात नष्ट झाले होते. येत्या १५ फेब्रुवारीला येणाऱ्या उल्केने पृथ्वीला आता धडक दिली नाही तर ती धडक २०२६ व २०६९ साली नक्कीच बसणार आहे, असे नासाच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. सोबतच डीए १४ ही अशनी पृथ्वीवर जरी आदळली नाही तरी ती एखादय़ा उपग्रहाला नक्कीच धडक मारेल, अशी भीती नासा व युरोपियन स्पेस एजंसीला आहे.
नासाचे पॅसाडोना, कॅलिफोर्निया येथील जेपीएलचे वैज्ञानिक पॉल चोडस यांनी उल्केची उपग्रहाला धडक बसण्याची शक्यता वर्तविली असून ते उल्का व उपग्रहांच्या मार्गाचा अभ्यास करीत आहेत.
अवकाशात सध्या १७६ उपग्रह आहेत. त्यामुळेच या उल्केपासून उपग्रहांना वाचवण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे. केवळ आपल्या सूर्यमालेत लाखो उल्का ग्रहांच्या मधून जात असतात. नासाकडे ६०१२९३ अॅस्टेराईडची व ३१८० धूमकेतूंची नोंद आहे त्यापैकी पृथ्वीला भविष्यात धोका असणाऱ्या ४७०० उल्का आहेत.
सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधून जाणाऱ्या उल्कांची जानेवारीतील संख्या ९० तर फेब्रुवारीमध्ये ८८ राहणार असून या उल्का सुरक्षित अंतरावरून जाणार आहेत. सुमारे ५० हजार वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्हय़ातील लोणार येथे मोठी उल्का कोसळली होती. या उल्कापाताने तयार झालले पृथ्वीवर आजपर्यत १५० मोठय़ा उल्का पडल्याच्या नोंदी आहेत. विनाशकारी उल्कांना नष्ट करण्याच्या यंत्रणा आज आपल्याकडे तरी कधी ना कधी पृथ्वीवर उल्का, अॅस्टेराईड व धूमकेतूंचा धोका कायम आहे, अशी माहिती सेंट्रल इंडिया स्कॉय वॉच ग्रुपचे अध्यक्ष व खगोल अभ्यासक सुरेश चोपणे यांनी दिली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jan 2013 रोजी प्रकाशित
पृथ्वीवर कोसळणाऱ्या एका उल्केची प्रतीक्षा..
दरवर्षी पृथ्वीजवळून जाणारी ४५ मीटर व्यासाची व एक लाख ३० हजार मेट्रिक टनाची २०१२ डीए-१४ नावाची मोठी अश्नी (अॅस्टेराईड) येत्या १५ फेब्रुवारीला पृथ्वीच्या अगदी जवळून म्हणजे २१ हजार किमी अंतरावरून जाणार असल्यामुळे अवकाशातील एखाद्या उपग्रहाशी टक्कर होण्याची दाट शक्यता असून तिचा मार्ग बदलल्यास ती पृथ्वीवरही आदळण्याची भीती आहे.
First published on: 01-01-2013 at 03:35 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comat that falls on earth