काँग्रेस सरकारने केलेल्या योजना लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी घेऊन जाव्यात, सामान्य लोकांना योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन सिडको ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड यांनी केले.
छाजेड यांनी सरकारने केलेल्या योजनांची माहिती दिली. आगामी काळात सिडकोमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी प्रदेश सचिव अश्विनी बोरस्ते, ब्लॉक अध्यक्ष अमोल जाधव, शहर उपाध्यक्ष राजेंद्र जायभावे, महिला काँग्रेस अध्यक्षा वत्सलाताई खैरे, ज्येष्ठ नेते के. के. नवले यांनीही मनोगत व्यक्त केले.
मेळाव्याचे आयोजन अमोल जाधव व शहर सरचिटणीस गोकुळ राव यांनी केले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष रमेश बागूल यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jun 2013 रोजी प्रकाशित
काँग्रेस कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत योजना पोहोचवाव्यात- अॅड. आकाश छाजेड
काँग्रेस सरकारने केलेल्या योजना लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी घेऊन जाव्यात, सामान्य लोकांना योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन सिडको ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड यांनी केले.
First published on: 08-06-2013 at 02:10 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress party worker should take the scheme up to general public ad akash chajed