महापालिकेने उत्पन्नाचे स्रोत बळकट करण्यासाठी नव्याने उपाययोजना कराव्यात, अशी सूचना चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी केली. मंगळवारी औरंगाबाद महापालिकेत अधिकाऱ्यांच्या बैठकीत चौथ्या वित्त आयोगामार्फत देण्यात आलेल्या प्रश्नावलीवर चर्चा करण्यात आली.
प्रश्नावलीची माहिती सर्वसाधारण सभेत ठेवून त्यावर पदाधिकारी, सदस्यांचे अभिप्राय नोंदवून घ्यावेत व ३१ मार्चपूर्वी आयोगाकडे कळवावेत, असेही डांगे यांनी म्हटले.महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबतची माहिती मंगळवारी चौथ्या वित्त आयोगाच्या अध्यक्षांना देण्यात आली. रस्ता रुंदीकरण मोहिमेसाठी राज्य सरकारमार्फत महापालिकेस निधी द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
रस्ता रुंदीकरण मोहिमेस वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी निधीसाठी शिफारस करावी, अशी विनंती करण्यात आली. महापालिकेतील लेखे, लेखापरीक्षण व अंदाजपत्रके यावरही विशेष चर्चा करण्यात आली.