खुल्या प्लॉटचा फेरफार नोंदवून सात-बारा उतारा देण्याच्या कामासाठी ४ हजार रुपये लाच स्वीकारताना लातूर तालुक्यातील मुरूड येथील तलाठय़ास पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
एकनाथ यादव यांनी मुरूड येथील शेतातील सव्र्हे नंबर ४९१ मधील प्लॉट क्रमांक ४०ची खरेदी केली होती. खरेदी के लेल्या प्लॉटचे फेरफार रजिस्टरला नोंद घेऊन तसा सात-बारा, ८ अ नमुना उतारा देण्याच्या कामासाठी मुरूड सज्जाचा तलाठी दिलीप हिप्परकर याने लाच मागितली होती. लाचेची रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास ग्रामसचिवालय कार्यालयाच्या आवारात पंचासमक्ष त्याला पकडले. या प्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.