मोटारसायकल घसरून खाली पडल्याचे पाहून हसल्याचा राग मनात धरून एका जोडप्याला बेदम मारहाण करून नंतर जाब विचारला असता पुन्हा मारहाण केली व २० ग्रॅमची सोनसाखळी व मोबाइल संच आणि रोख रक्कम असा सुमारे ४२ हजारांचा ऐवज बळजबरीने चोरल्याप्रकरणी दोघाजणांविरूध्द एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतरत्न इंदिरानगर येथे हा प्रकार घडला.
विजय चौगुले व संदीप चौगुले (रा. विनायकनगर, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. हे दोघे सकाळी मोटारसायकलवरून भारतरत्न इंदिरानगर भागातून जात असताना अचानकपणे गाडी घसरल्याने खाली कोसळले. त्यावेळी तेथील जोडप्याला हसू आले. परंतु हसल्याचा राग मनात धरून विजय व संदीप यांनी, तुम्ही आमच्याकडे पाहून का हसलात, असे म्हणून त्या जोडप्याला बेदम मारहाण केली. ही बाब त्या जोडप्याच्या भाच्याला समजल्यानंतर त्याने विचारणा केली असता विजय व संदीप यांनी त्यालाही बेदम मारहाण केली व त्याच्या अंगावरील सोनसाखळी, मोबाइल संच व रोख रक्कम असा ऐवज बळजबरीने काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
कार दुकानात घुसली
शहरातील कुमठा नाका भागातील स्वागतनगर परिसरात एका दुकानात भरधाव चारचाकी मोटार घुसल्याने घडलेल्या अपघातात चौघे जण जखमी झाले. उमेश चिदानंद कोळेकर (वय २८), कृष्णा शंकर साखरे (वय २५, दोघे रा. जगजीवनराम झोपडपट्टी, सोलापूर), आसीफ नूरअहमद शेख (वय २१, रा. विनायकनगर, सोलापूर) व सुनील विजय सोनार (वय २४, स्वागतनगर, सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर वाहनचालकाने पलायन केले.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jan 2013 रोजी प्रकाशित
हसल्यामुळे जोडप्याला गुंडांची मारहाण, लुटमार
मोटारसायकल घसरून खाली पडल्याचे पाहून हसल्याचा राग मनात धरून एका जोडप्याला बेदम मारहाण करून नंतर जाब विचारला असता पुन्हा मारहाण केली व २० ग्रॅमची सोनसाखळी व मोबाइल संच आणि रोख रक्कम असा सुमारे ४२ हजारांचा ऐवज बळजबरीने चोरल्याप्रकरणी दोघाजणांविरूध्द एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतरत्न इंदिरानगर येथे हा प्रकार घडला.
First published on: 16-01-2013 at 08:20 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple bitten by roughneck in solapur