जिल्ह्य़ात रस्ता दुरुस्तीच्या व डांबरीकरणाच्या नावाखाली क ोटय़यवधींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप पी.पी.कोठारी यांनी केला असून महाराष्ट्र शासन केव्हा चौकशी करणार, या बाबतचे निवेदन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर.आर.पाटील यांना दिले आहे. रस्ता दुरुस्तीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची उदाहरणे देत त्यांनी सांगितले की, बुलढाणा-अजिंठा मार्गावर वालसावंगी फाटय़ाजवळ फलकावर १ क ोटी ७८ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे लिहिले आहे. प्रत्यक्षात एक कि.मी. रस्त्याच्या सुधारणेस ५९ लाख रुपये खर्च लागतो. सार्वजनिक बांधकाम विभाग सिल्लोड यांनी २०१०-२०११ च्या मंजूर कामात लहान पुलाच्या दुरुस्तीस ३७ लाख २४ हजार रुपयांच्या निविदा तीन सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दिल्या, पण प्रत्यक्षात कि.मी. १९५ मध्ये एकही पूल नाही. हा भ्रष्टाचाराचा एक नमुना आहे. तक्रारी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यांची चौकशी करणार का असा प्रश्न कोठारी यांना पडला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Dec 2012 रोजी प्रकाशित
डांबरीकरणात कोटय़वधींचा भ्रष्टाचार
जिल्ह्य़ात रस्ता दुरुस्तीच्या व डांबरीकरणाच्या नावाखाली क ोटय़यवधींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप पी.पी.कोठारी यांनी केला असून महाराष्ट्र शासन केव्हा चौकशी करणार, या बाबतचे निवेदन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर.आर.पाटील यांना दिले आहे.
First published on: 28-12-2012 at 01:35 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curruption in road repaire