लाचखोर फौजदाराला कोठडी

विवाहितेने जाळून घेतल्याच्या गुन्ह्य़ात सहआरोपी न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलेला सिरसाळा पोलीस ठाण्याचा फौजदार शिवाजी िशदे याला न्यायालयाने ४ डिसेंबपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

विवाहितेने जाळून घेतल्याच्या गुन्ह्य़ात सहआरोपी न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलेला सिरसाळा पोलीस ठाण्याचा फौजदार शिवाजी िशदे याला न्यायालयाने ४ डिसेंबपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संगीता नारायण राठोड (वय २५) या विवाहितेने सासरच्या छळास कंटाळून जाळून घेतले. या प्रकरणी मयत विवाहितेच्या सासू-सासऱ्यास अटक करण्यात आली. या गुन्ह्य़ात नारायण राठोड यास सहआरोपी न करण्यासाठी फौजदार िशदे याने २५ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीत २० हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, राठोड यांनी याची माहिती लाचलुचपत विभागाला दिली. त्यानुसार फौजदार िशदे याला तक्रारदाराकडून २० हजारांची लाच घेताना शुक्रवारी विभागाच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडले. शनिवारी अंबाजोगाई न्यायालयासमोर हजर केले असता ४ डिसेंबपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Custody to corrupt inspector

ताज्या बातम्या