scorecardresearch

शाहू महाराजांना विविध कार्यक्रमांव्दारे अभिवादन

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराजांनी उभारलेल्या येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या उ मराठा वसतीगृहात संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराजांनी उभारलेल्या येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या उ मराठा वसतीगृहात संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रा. अशोक सोनवणे यांचे ‘सर्वासाठी शाहु महाराज’ या विषयावर व्याख्यान झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सी. पी. चित्रे तर, प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, कार्याध्यक्ष संतोष गायधनी उपस्थित होते. शाहू महाराजांच्या जीवनावरील विविध प्रसंगावर मार्गदर्शन करताना प्रा. अशोक सोनवणे यांनी महाराजांमुळे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची पायाभरणी होऊ शकली, असे नमूद केले. यावेळी सोनवणे यांनी महाराजांच्या नाशिक भेटीचे विविध दाखले दिले. निसाळ यांनी शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य तर, माधुरी भदाणे यांनी सामाजिक कार्य तर संतोष गायधनी यांनी महाराजांच्या शैक्षणिक कार्याविषयी माहिती दिली. निसाळ यांनी शाहू महाराजांचा नाशिकमध्ये पुतळा होण्यासाठी प्रयत्न केले जातील असे नमूद केले. सूत्रसंचालन संतोष गायधनी यांनी केले.
शाळा क्रमांक २८ तर्फे देखावे
चुंचाळे येथील महापालिका शाळा क्रमांक २८ तर्फे राजर्षी शाहू महाराज जन्मदिन हा ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी सामाजिक प्रसंगांवर आधारित देखावे साकारण्यात आलेली फेरी काढण्यात आली. फेरीनंतर शाळेच्या प्रांग मुख्याध्यापक अर्जुन राजभोज यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. विद्यार्थिनींनी राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावर मनोगत व्क्त केले. अनिल सुळ यांनी शाहूंचे जीवनकार्य, शिक्षणातील आमूलाग्र बदल, सामाजिक विकास आदींवर विचार मांडले. जयंत येवला यांनी राजर्षी शाहूंचे शालेय जीवन, वसतीगृहाची सोय, लोकराज्य ही संकल्पना, शैक्षणिक योगदान याविषयी मनोगत व्यक्त केले. राजभोज यांनी शाहूंचे जीवनकार्य, शिष्यवृत्ती, योजना, मोफत शिक्षण आदींचा आढावा घेतला. सूत्रसंचालन लक्ष्मी कोल्हे व प्रतिक्षा शेवलेकर यांनी केले.
सारडा कन्या विद्यामंदिरात कार्यक्रम
नाशिकमधील रामप्यारीबाई सारडा कन्या विद्यामंदिरमध्ये शाहू महाराज जयंतीनिमित्त सकाळ सत्रात शिक्षिका लता विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींनी कार्यक्रम सादर केला. अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापिका आशा डावरे तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक प्रदीप कुलकर्णी, अतुल भालेराव उपस्थित होते. यावेळी वैभवी परदेशी, श्रेया दुसाने, हर्षदा यादव यांची भाषणे झाली. प्रमुख पाहुण्यांनी महाराजांच्या विविध पैलूंविषयी माहिती दिली. काही विद्यार्थिनींनी भित्तीपत्रके तयार केली. यानिमित्ताने सातवीच्या मुलींनी ग्रंथालयास ४१ पुस्तके भेट दिली.
दुपार सत्रात श्यामला पाटील यांच्या वर्गाने कार्यक्रम सादर केला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सविता खरे तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनंदा जगताप उपस्थित होत्या. व्यासपीठावर संध्या जोशी,  अतुल करंजे उपस्थित होते. याप्रसंगी प्राची शिरसाठ, अंजली दिवटे यांची भाषणे झाली. मुस्कान शेख, वैष्णवी सातपुते, साक्षी जेजूरकर, हर्षांली काळे यांनी महाराजांच्या जीवनावर नाटिका सादर केली. सूत्रसंचालन सायली उमरे, निकिता पाटील यांनी केले. आभार श्रद्धा पाटील व श्यामला पाटील यांनी मानले.
काँग्रेस समितीतर्फे अभिवादन
नाशिक शहर काँग्रेस समितीत शाहू महाराज जयंतीनिमित्त शहराध्यक्षा अश्विनी बोरस्ते व नगरसेवक शाहू खैरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. छत्रपती शाहू महाराजांनी जीवनाच्या अखेपर्यंत सामाजिक चळवळीतून सर्वाना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचे बोरस्ते यांनी सांगितले. अस्पृश्यतेचे वातावरण दूर करण्यासाठी आणि वंचितांना मुख्य प्रवाहात बहुजनांसमवेत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यावेळी महिलांना व मागासवर्गीयांना ५० टक्के आरक्षण देण्यासाठी लढले अशी माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस हेमलता पाटील, स्वातंत्र्य सैनिक पंडित येलमामे, संजय पगारे, गणेश खिराडकर आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त ( Nasik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Different organization conducted programs in memorial of shahu maharaj

ताज्या बातम्या