बजाज ऑटोची सर्वात अत्याधुनिक १०० सीसी क्षमता असणारी ‘डिस्कव्हर १०० टी’ ही बाईक कोल्हापुरात दाखल झाली. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते या गाडीचे अनावरण करण्यात आले.         
या वेळी बजाज कंपनीचे जनरल मॅनेजर विमल सुम्बली, झोनल मॅनेजर विकल्प कपूर, मिलिंद पेंढारकर, विक्री व्यवस्थापक गिरीश निकुंभ, कदम बजाजचे संचालक नीलेश कदम, साई सव्र्हिसेसचे अतुल जाधव उपस्थित होते.     
या वेळी विमन सुम्बली म्हणाले, ‘डिस्कव्हर १०० टी’ ही बाइक १०० सीसी श्रेणीमधील भारतातील एक क्रांतिकारक बाईक आहे. सामान्य १०० सीसी बाईक्सपेक्षा या गाडीत ३० टक्के जास्त पॉवर आहे. ८७ कि.मी.प्रति लिटर मायलेज, नायट्रॉक्स सस्पेंशन, डीसी फ्लिकर फ्री हेडलॅम्प व मेन्टनन्स फ्री बॅटरी हे तिचे खास वैशिष्टय़ आहे. ५ स्पीड गियर बॉक्स असलेली ही नवी बाइक चार रंगांत उपलब्ध आहे.     
गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, बजाजने नेहमीच सुरक्षिततेला प्राधान्य दिल्याने ती ग्राहकांना फायदेशीर ठरत आहे. या वेळी पाटील यांच्या हस्ते पहिल्या दोन ग्राहकांना गाडीच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या.