आर्णी येथील वसंतराव नाईक अपंग निवासी विद्यालयात अस्थिव्यंग अपंगांसाठी आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्यात. जिल्हय़ातील एकूण सतरा शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पध्रेतील विजेत्यांची सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पध्रेसाठी निवड झाली.
स्पध्रेचे उद्घाटन समाजकल्याण अधिकारी अविनाश देशरवार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकास्तरीय समन्वय समितीचे अध्यक्ष साजीद बेग मिर्झा होते. प्रमुख पाहुणे म्हणून आर्णीचे नगराध्यक्ष अनिल आडे, भीकचंद लोहिया, खुशाल ठाकरे, गणेश हिरोळे, प्रवीण मुनगीनवार, शेखर खंदार उपस्थित होते. अस्थिव्यंग प्रवर्गाच्या क्रीडास्पर्धेत सॉफ्ट ग्रोबॉल स्पर्धाही घेण्यात आल्यात. या सॉफट ग्रोबॉल स्पध्रेत श्रावणबळी-अपंग विद्यालय पार्डी, २५ मीटर धावणे दोन्ही पायाने चांगले व कमरेवरील अपंग यात दुसऱ्या बाबाराव कुरूसंगे, अपंग विद्यालय आर्णी, व्हील चेअर रेसे, सुचिता बर्डे अपंग विद्यालय महागाव, गोळाफेकमध्ये संदीप बोरचाटे, अपंग विद्यालय आर्णी या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटाकाविला. दरम्यान या विजेत्या स्पर्धकांची निवड सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पध्रेसाठी करण्यात आलेली आहे. बक्षीस वितरण सोहळय़ाला प्रमुख पाहुणे म्हणून आर्णीचे नगराध्यक्ष अनिल आडे, जितेंद्र मोघे, आरिफ बेग मिर्झा, जावेद सोळंकी, चपलेवार, अन्वर पठाण, तुलसीदास मोरकर, रमेश ठाकरे, उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व शिल्ड देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश अंदुरे यांनी केले. सचिन अंबडवार यांनी आभार मानले. दरम्यान, स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रेमदास जाधव, विनोद थुल, विलास ठाकरे, रमेश सावंत, विनोद चव्हाण, आशा खोत, ज्योती अरणकर, सुनीता राठोड, रवींद्र पवार, भीमराव भवरे आदींनी पुढाकार घेतला.
संग्रहित लेख, दिनांक 27th Dec 2012 रोजी प्रकाशित
प्रचंड उत्साहात अपंगांच्या जिल्हा क्रीडा स्पर्धा
आर्णी येथील वसंतराव नाईक अपंग निवासी विद्यालयात अस्थिव्यंग अपंगांसाठी आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्यात. जिल्हय़ातील एकूण सतरा शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पध्रेतील विजेत्यांची सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पध्रेसाठी निवड झाली.
First published on: 27-12-2012 at 01:08 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distrect sports competiton for handicaps