शहरात विविध संस्था व संघटनांनी सामाजिक जागृतीचे भान राखत दीपावलीनिमित्त सामाजिक उपक्रम राबविले. दीपावलीचा आनंद गरीब, गरजूंना मिळवून देण्यासाठी फराळ जमवून त्याचे वाटप करण्यात आले. त्यासाठी नागरिकांकडूनही कार्यकर्त्यांना चांगलेच सहकार्य मिळाले.
नशाबंदी मंच
नाशिक जिल्हा नशाबंदी मंचतर्फे उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्या अध्यक्षतेखाली उंटवाडी रोडवरील निरीक्षणगृहातील विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक दिवे, गं. पा. माने, अविनाश आहेर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बग्गा यांनी समाजातील उपेक्षित घटकांना आपल्या आनंदात सामावून घेण्याकरिता मंचने राबविलेल्या उपक्रमाचा इतर संस्थांनी आदर्श घेण्याचे आवाहन केले. मंचतर्फे राबविण्यात आलेली दोन लाडू, एक करंजी ही संकल्पना प्रत्येक घरात रुजली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक मोहन जगताप यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत बोंबले यांनी केले. सूर्यकांत आहेर यांनी आभार मानले.
‘एक करंजी दोन लाडू’उपक्रम
नेचर क्लब ऑफ नाशिक, दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान, ज्ञानदीप मंडळ, अण्णासाहेब मुरकुटे सांस्कृतिक विकास मंडळ यांच्या वतीने शहरातील गंगापूर रोड, शरणपूर रोड परिसरात ‘एक करंजी दोन लाडू, अनाथ अपंगांशी नाते जोडू’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत परिसरात फराळ जमा करण्यासाठी फेरी काढण्यात आली. फेरीची
सुरुवात आनंद क्लासेसपासून
झाली. या उपक्रमात विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जमा झालेला फराळ व कपडय़ांचे संत गाडगे महाराज ट्रस्टच्या सहकार्याने फणसपाडा येथे आदिवासींना वाटप केले जाणार आहे. फेरीत माजी उपमहापौर अ‍ॅड. मनीष बस्ते, नेचर क्लबचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, अ‍ॅड. रमेश वैद्य आदीं सहभागी झाले होते.
संत गाडगे धर्मशाळा ट्रस्ट
नाशिक येथील श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्टतर्फे दिवाळीत महापौर अशोक मुर्तडक, उपायुक्त रोहिदास बहिरम यांच्या हस्ते ४०० अंध, अपंग आणि गरिबांना फराळाचे वाटप करण्यात आले. ट्रस्टच्या वतीने फराळासोबत गुलाबपुष्प, तेल, साबणही देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त
वसंत बोधले, प्रमुख पाहुणे
म्हणून नगरसेविका वत्सला खैरे उपस्थित होते. कुणाल देशमुख यांनी स्वागत केले.
नाशिक जिल्हा नशाबंदी मंचतर्फे निरीक्षणगृहातील मुलांना फराळ वाटप करताना उपमहापौर गुरुमित बग्गा, अशोक दिवे, गं. पा. माने, अविनाश आहेर, मोहन जगताप आदी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali faral distribution to needed people
First published on: 28-10-2014 at 07:08 IST