दारू पिण्यास पैसे न दिल्याने संतापलेल्या दारूडय़ाने पत्नीला लाकडी फळीने मारहाण करून तिची हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा येथील खोलापुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान नगर येथे घडली.
कमला संजय ढोले (४५) असे मृत महिलेचे नाव आहे. हत्येच्या या प्रकरणात पोलिसांनी आरोपी संजय विठ्ठलराव ढोले (५०) याला अटक केली.आरोपी संजयला दारूचे व्यसन आहे.रात्री तो दारूच्या नशेतच घरी आला  पत्नीकडे पैसे मागू लागला. कमलाने नकार दिल्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यातच आरोपीने संजयने लाकडी फळीने कमलाला मारहाण केली. एका क्षणी त्याने तिचे केस पकडून तिचे डोके लाकडी पलंगाच्या कोपऱ्यावर आदळले. त्यात कमलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचा मृत्यू झाला. आरडाओरड ऐकून शेजारी धावले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. आरोपी संजयचा मुलगा राहुल याच्या तक्रारीच्या आधारे खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपी संजयच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवून त्याल अटक केली आहे. दररोजची भांडणे म्हणून शेजारीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत होते, पण काल रात्री अशाच भांडणात मात्र,  कमलाचा बळी गेला.