नांदेडला अभंग ग्रंथोत्सव
अभंग ग्रंथोत्सवात उद्या (बुधवारी) आमदार देवेंद्र फडणवीस यांचे अनुभवकथन होणार आहे. गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळ विधानसभा व विधानसभेबाहेर आपल्या कर्तृत्वाने, वक्तृत्वाने वेगळा ठसा उमटवणाऱ्या फडणवीस यांचा नांदेडात प्रथमच जाहीर कार्यक्रम होत आहे. सायंकाळी ६ वाजता कुसुम सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयाचे मेडिकल डायरेक्टर डॉ. अनंत पंढरे, पत्रकार सुशील कुलकर्णी यांची उपस्थिती असणार आहे. ‘मी व माझे कार्य’ यावर फडणवीस अनुभवकथन करणार आहेत. कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक संजीव कुळकर्णी, नीमा कुळकर्णी, उमेश व गणेश कस्तुरे यांनी केले आहे.