अर्जावर आरटीओ अधिकाऱ्यांच्या खोटय़ा सह्य़ा व शिक्के

मोटार ट्रेनिंग स्कूलच्या परवान्याचे नूतनीकरण झालेले नसतानाही सुमारे ३४ प्रशिक्षणार्थीच्या अर्जावर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या खोटय़ा सह्य़ा व शिक्के मारून बनावट कागदपत्रे कार्यालयात दाखल केल्याप्रकरणी ओमसाई मोटार ट्रेनिंग स्कूलचे चालक ज्ञानेश्वर बबन कदम यांच्याविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोटार ट्रेनिंग स्कूलच्या परवान्याचे नूतनीकरण झालेले नसतानाही सुमारे ३४ प्रशिक्षणार्थीच्या अर्जावर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या खोटय़ा सह्य़ा व शिक्के मारून बनावट कागदपत्रे कार्यालयात दाखल केल्याप्रकरणी ओमसाई मोटार ट्रेनिंग स्कूलचे चालक ज्ञानेश्वर बबन कदम यांच्याविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
ओमसाई मोटार ट्रेनिंग स्कूलच्या परवान्याचे नूतनीकरण झालेले नाही. असे असतानाही स्कूलचे चालक ज्ञानेश्वर कदम यांनी सुमारे ३४ प्रशिक्षणार्थीच्या परवाना अर्जावर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या खोटय़ा सह्य़ा व शिक्के मारून बनावट कागदपत्रे तयार केली. तसेच ही कागदपत्रे खरी आहेत, असे भासवून वागळे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा केली. जानेवारी ते सप्टेंबर २०१२ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: False signature and stamp of rto officer on application

ताज्या बातम्या