शहराजवळच असलेल्या पानेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या कार्यालयाला आग लावून महत्त्वपूर्ण दस्तऐवज जाळून टाकण्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
लोकशिक्षण प्रसारक मंडळाच्या या शाळेच्या मुख्य कार्यालयाचे कुलूप तोडून पहाटेच्या सुमारास आतील कपाट व त्यातील कागदपत्रे, दप्तर व दस्तऐवज जाळून टाकण्यात आले. या संदर्भात मनमाड पोलिसांनी मुख्याध्यापिका अनिता देवळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पहाटेच्या वेळी लागलेली आग मोठय़ा प्रमाणात असल्याने ती विझविण्यासाठी मनमाड पालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले होते.
संग्रहित लेख, दिनांक 21st Nov 2013 रोजी प्रकाशित
पानेवाडी शाळेच्या कार्यालयास आग
शहराजवळच असलेल्या पानेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या कार्यालयाला आग लावून महत्त्वपूर्ण दस्तऐवज जाळून टाकण्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
First published on: 21-11-2013 at 08:05 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire to school office