जागतिक खाद्य महोत्सवाच्या निमित्ताने आर सिटी मॉल, घाटकोपर पश्चिम येथे नऊ दिवसांचा खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत या महोत्सवात सहभागी होऊन विविध खाद्यपदार्थ तयार करायला शिकणे आणि विविध खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्याची संधी खवय्यांना मिळणार आहे.
लोकप्रिय शेफ या महोत्सवात प्रात्यक्षिकांसह विविध खाद्यपदार्थ कसे तयार करायचे ते शिकविणार आहेत. थेट प्रात्यक्षिकांची विविध सत्रे लोकांसाठी आयोजित करण्यात आली आहेत. लोकप्रिय शेफ अनेक पदार्थाच्या ‘सिक्रेट रेसिपीज्’ लोकांसमोर उघड करून खाद्यपदार्थ तयार करून दाखविणार आहेत. या खाद्य महोत्सवात इंडिगो डेली, पंजाब ग्रील, ब्राऊल हाऊसक, राजधानी, बनाना ली, टाको बेल, योकोज्, जाफरान असे खाद्यपदार्थ उद्योगातील किरकोळ विक्रेते सहभागी होणार असून त्याबरोबरच अनेक नवनवीन रेस्टॉरंट्सची लाइव्ह बुकिंग काऊण्टरही उपलब्ध असतील.  
संपर्क – ९८३३५०१००७