कमानी ऑईल इंडस्ट्रीजने तांदळाच्या कोंडय़ापासून खाद्यतेलाची निर्मिती  केली आहे. कंपनीने तयार केलेले शंभर टक्के शुद्ध रिसो तेल नुकतेच बाजारात दाखल केले आहे. तांदळाच्या गिरण्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात कोंडा उपलब्ध असतो. या कोंडय़ापासून तयार केलेले हे मूल्यवर्धित खाद्यतेल कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिसेराईड्सचे प्रमाण कमी करणारे असून नैसर्गिकरित्या ओरिझ्ॉनोलने समृद्ध असल्याचा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय व भारतीय स्तरावर करण्यात आलेल्या अभ्यासावर आधारित आहे.
या तेलात  सॅच्युरेटेड स्निग्धाम्ले (साफा), मोनोअनसॅच्युरेटेड स्निग्धाम्ले (मुफा) व पॉलिअन सॅच्युरेटेड स्निग्धाम्ले (पुफा) अशी तीन प्रकारची स्निग्धाम्ले आढळतात. हे तेल हृदयाशी संबंधित विकारांना आळा घालण्यास हितकारक असून कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन पोषणात्मक मूल्य पुरविते, असे कमानी ऑईल इंडस्ट्रीजचे संचालक विनय चावला यांनी सांगितले. इतर खाद्य तेलाशी तुलना करता हे तेल अधिक काळ टिकणारे असून यात समृद्ध स्त्रोत आहेत. सूक्ष्मपोषकद्रव्यांचा यात समावेश आहे, असे एसएनडीटी विद्यापीठाच्या फूड सायन्स अ‍ॅण्ड न्युट्रिशन विभागाच्या डॉ. मीना मेहता यांनी
सांगितले.
धरमपेठेतील सौभाग्य रत्न बुटिक गेल्या पाच वर्षांपासून उच्च दर्जाचे रत्न, रुद्राक्ष व ज्योतिष मार्गदर्शन उपलब्ध करून देत असून आता सीताबर्डीत नवीन शाखा सुरू करीत आहे. सांस्कृतिक संकुलातील तळमजल्यावरील सौभाग्य रत्नच्या शोरुमचे उद्घाटन ८ डिसेंबरला सौभाग्य रत्नचे समूह संचालक विद्यानंद वर्मा यांच्या हस्ते होणार आहे. कंपनी ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करीत आहे. पुखराज, नीलम, गोमेद, पन्ना, माणिक, मोती, मुंगा, ओपल रत्न, जामुनिया, सुनैला, सफेद मुंगा, जरकन, टोपाज आदी रत्ने विक्रीसाठी उपलब्ध आहेत, असे संचालक अनुराग वर्मा यांनी सांगितले.
एचडीएफसी बँकेच्या वतीने उद्या, गुरुवारी राष्ट्रीय रक्तदान मोहीम राबविण्यात येणार आहे. देशातील ही सर्वात मोठी एक दिवसीय रक्तदान मोहीम असून ५७२ शहरांमध्ये राबविली जाणार आहे.  सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत  रक्तदान करता येईल. गरजू लोकांना रक्त उपलब्ध होण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या आवाहनानुसार एचडीएफसी बँक स्थानिक मोठय़ा रुग्णालयांच्या सहकार्याने ही मोहीम राबवित  
आहे.