ट्रॅव्हल्स अॅन्ड टुरिझम व्यवसायात तब्बल १७० वर्षांचा अनुभव असणाऱ्या आणि तितक्याच कार्यतत्परतेने पर्यटकांच्या सेवेत रुजू असणाऱ्या थॉमस कुकतर्फे २०१३ वर्षांतील सहलींकरिता हॉलिडे पे हॉलिडे फ्री ऑफरचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीचे मॅनेजर अमित चौकले यांनी येथे दिली. या ऑफरमध्ये १५ दिवसांच्या युरोप टूर बुकिंगवर ९ दिवसांची सिंगापूर, मलेशिया, थायलंड टूर तर १४ दिवसांच्या अमेरिका टूर वर ८ दिवसांची कॅनडा टूर पूर्णपणे मोफत देण्यात आली आहे. तसेच १४ दिवसांच्या ऑस्ट्रेलिया टूर बुकिंगवर ५ दिवसांची न्यूझीलंड टूर आणि १० दिवसांच्या साऊथ आफ्रिका टूर वर ४ दिवसांची केनिया टूर पूर्णपणे मोफत देण्यात आली आहे. ही ऑफर १३ जानेवारीपर्यंत असून या योजनेचा जास्तीत जास्त पर्यटकांनी लाभ घ्यवा, असे आवाहन चौकले यांनी केले आहे. थॉमस कुकचे ब्रँच ऑफिस रायसन प्रेस्टिज कॉम्प्लेक्स, हॉटेल दामिनी समोर, ताराबाई पार्क येथे असून या ठिकाणी देशांतर्गत तसेच परदेशी सहली, आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांचे आरक्षण, व्हिसा, ट्रॅव्हल्स, इन्शुरन्स फॉरेन एक्स्चेंज आदी सुविधा दिल्या जातात. जगभर नावाजलेल्या थॉमस कुकच्या पर्यटन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.