बालिकाश्रम रस्त्यावरील बोरुडे मळय़ात आढळून आलेला इंडियन कोब्रा या जातीचा अत्यंत विषारी नाग नुकताच पकडून निसर्गात मुक्त करण्यात आला. सर्पमित्र अॅड. हर्षद काकडे यांनी हा नाग पकडला. सहा फूट अशी पूर्ण वाढ झालेला नाग पाहून नागरिकांनी कटारिया व चारुदत्त जगताप यांच्याशी संपर्क साधला होता. वातावरणातील उष्णता कमालीची वाढली असून भूगर्भातही त्याचे परिणाम होतात. ही उष्णता असहय़ होऊन हे नाग बिळातून बाहेर पडतात असे कटारिया यांनी सांगितले. नागरिकांनी अशा वेळी साप व नाग मारू नये, तसेच ९८८१३७७७७२ किंवा ७५८८१७०४४२ या मोबाइलवर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.