विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या माहेरच्या लोकांनी तिच्या पतीच्या घरासमोर तिचे अंत्यसंस्कार केले.
या बाबत वाई पोलिसांनी सांगितले की, वासोळे (ता. वाई) येथील नंदा बाळकृष्ण नवघणे हिचा विवाह आठ वर्षांपूर्वी जांभळी येथील (ता. वाई) सुरेश शिवराम चिकणे यांच्या बरोबर झाला होता. विवाहानंतर दोन वर्षांनी नंदा पतीसोबत कोपरखैरणे सेक्टर ४ नवी मुंबई येथे रहायला गेली. तिला दोन मुले आहेत. शनिवार दि.५ रोजी रात्री नऊच्या सुमारास तिचा विष प्राशन केल्याने मृत्यू झाला.
या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी जाचहाट करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सुरेश याला अटक केली असल्याचे समजते. दरम्यान आज सकाळी नंदाचा मृतदेह जांभळी येथे आणण्यात आला. पतीच्या जाचहाटीमुळे नंदाचा मृत्यू झाल्यामुळे माहेरच्या लोकांनी संतप्त होऊन सासरच्या लोकांना मृतदेहास हात लावण्यास मज्जाव केला. त्यामुळे गावात तणाव वाढला. अखेर माहेरच्या लोकांनी पतीच्या घरासमोरच अंत्यसंस्कार केले. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाल्याने वाई पोलिसांनी तेथे बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या वेळी दोन्ही गावचे सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. अंत्यसंस्कार करणाऱ्या माहेरच्या लोकांनी नंदाचा सावडण्याचा विधी व पुढील धार्मिक विधी करण्यास नकार दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jan 2013 रोजी प्रकाशित
विवाहितेच्या पार्थिवावर सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार
विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या माहेरच्या लोकांनी तिच्या पतीच्या घरासमोर तिचे अंत्यसंस्कार केले.
First published on: 08-01-2013 at 07:24 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funeral on married in front of her husbands home