पुण्यातील ‘नाते समाजाशी’ आणि ‘जयहिंद परिवार’ या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा गौरव महाराष्ट्राचा पुरस्कार सोलापूरचे माजी खासदार तथा लोकमंगल उद्योग समूहाचे संस्थापक-अध्यक्ष सुभाष देशमुख यांना जाहीर झाला आहे. येत्या १२ मे रोजी पुण्यात एस. एम.जोशी सभागृहात आयोजिलेल्या समारंभात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
या पुरस्कारवितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान काँग्रेसचे माजी आमदार उल्हास पवार हे भूषविणार असून यावेळी ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्यासह निवृत्त कर्नल मोहन काकतीकर, उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार असल्याचे संयोजक नारायण फड यांनी कळविले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th May 2013 रोजी प्रकाशित
सुभाष देशमुख यांना गौरव महाराष्ट्राचा पुरस्कार
पुण्यातील ‘नाते समाजाशी’ आणि ‘जयहिंद परिवार’ या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा गौरव महाराष्ट्राचा पुरस्कार सोलापूरचे माजी खासदार सुभाष देशमुख यांना जाहीर झाला आहे.
First published on: 11-05-2013 at 12:05 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gaurav maharashtracha puraskar to subhash deshmukh