येथील बासरीवादक जितेंद्र प्रताप रोकडे यांना पुण्यातील अमूल्य ज्योती ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा बासरीचे युगपुरुष पं. पन्नालाल घोष पुरस्कार व शिष्यवृत्ती समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. जितेंद्र सध्या पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात एम. ए. (बासरी) अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत.
पुणे येथे झालेल्या पं. घोष स्मृती समारोहात पं. केशव गिंडे यांच्या हस्ते व पुणे आकाशवाणीचे सुनील देवधर यांच्या उपस्थितीत पुरस्कार व शिष्यवृत्तीचा धनादेश देण्यात आला. शिष्यवृत्ती बासरीतील पुढच्या शिक्षणासाठी आहे. जितेंद्र सध्या पं. गिंडे यांच्याकडेच बासरीचे शिक्षण घेत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 30th Sep 2013 रोजी प्रकाशित
बासरीवादक रोकडे यांना घोष पुरस्कार व शिष्यवृत्ती
येथील बासरीवादक जितेंद्र प्रताप रोकडे यांना पुण्यातील अमूल्य ज्योती ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा बासरीचे युगपुरुष पं. पन्नालाल घोष पुरस्कार व शिष्यवृत्ती समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली.
First published on: 30-09-2013 at 01:43 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghosh award and scholarship to basarivadak rokade