महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार आरोपी मोबीन शेख याला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने बुधवारी सायंकाळी ही कारवाई केली असून आरोपी मोबीन याने मंगळसूत्र चोरीच्या १७ घटनांमध्ये आपल्या टोळीचा हात असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
पोलिसांनी मंगळसूत्र चोरी प्रकरणात यापूर्वी पप्पू मधुकर चौधरी, विक्की अनिल देशमुख, अभिलाष श्रीकांत नंदुरकर, राम लुटे, धनंजय चिंचे आणि राहुल गुल्हाने या सहा जणांना यापूर्वीच अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या टोळीचा मुख्य सूत्रधार मोबीन शेख हा फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंदनसिंह बयास आणि त्यांच्या पोलीस पथकाने मोबीनला अटक केली.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jan 2013 रोजी प्रकाशित
मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा म्होरक्या अखेर गजाआड
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार आरोपी मोबीन शेख याला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने बुधवारी सायंकाळी ही कारवाई केली असून आरोपी मोबीन याने मंगळसूत्र चोरीच्या १७ घटनांमध्ये आपल्या टोळीचा हात असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
First published on: 04-01-2013 at 02:54 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold chain robbers leader got arrest