स्वयम सामाजिक संस्थतर्फे बालक दिनानिमित्त ‘बाल हक्क, कन्या भ्रूणहत्या, पक्षी वाचवा’ या विषयावर चंद्रमणी नगरातील कुकडे लेआऊट उद्यानात चित्रकला स्पर्धा आयोजित  करण्यात आली होती. या स्पर्धेत चिमुकल्यांनी सुंदर चित्रे रेखाटली.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दीनानाथ पडोळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते विशाल मुत्तेमवार व विरोधी पक्षनेते विकास ठाकरे उपस्थित होते. पर्यावरण वाचवण्यासाठी पक्षी वाचवणे काळाची गरज असल्याचे आमदार पडोळे म्हणाले. कार्यक्रमाच्या आयोजिका व सामाजिक कार्यकर्त्यां कल्पना सपकाळ यांनी स्त्री भ्रूणहत्येमुळे स्त्रियांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली. पक्ष्यांसाठी आपल्या घराच्या अंगणात किंवा छतावर धान्य व पाणी एका भांडय़ात ठेवण्याचे आवाहन केले. या स्पर्धेत १००३ मुले-मुली सहभागी झाले.
सायकल हे प्रथम पारितोषिक राजश्री ठाकरे हिला देण्यात आले. ३ ते ५ वर्षे वयोगटातील हितेश बागडे, सिद्धांत कडू, ६ ते ११ वयोगटातील अश्विनी तपासे, अमिशा रंगारी, सुहानी डोंगरे, १२ ते १८ वयोगटातील अतुल बुलकुंडे, रूपल रामटेके, कविता कुंभारे, अभिजित कोरे यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. प्रत्येक स्पर्धकाला नगरसेवक तनवीर अहमद, शीला तराडे, डॉ. विनोद गजघाटे, डॉ. हर्षवर्धन राहोते, मारोतराव महेशकर, रत्नमाला फोपरे, शेषराव मेश्राम, निशा मेश्राम यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good responce the drawing competition
First published on: 20-11-2013 at 08:38 IST