‘विद्या मंदिर’ संस्थेच्या ‘गोरेगाव रात्र शाळे’चा हिरक महोत्सवी कार्यक्रम ३० डिसेंबरला आयोजिण्यात आला आहे. ए. बी. गोरेगावकर इंग्रजी माध्यम शाळेच्या प्रांगणात सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम होईल. खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे गिरीश सामंत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. ६ मार्च,  १९५२ साली जी. बी. भडकमकर आणि के. एन. छच्छड यांनी गॅसबत्तीच्या प्रकाशात गोरेगाव रात्रशाळा सुरू केली. विजेची सोय नसल्याने बरीच वर्षे गॅसबत्तीवर शाळा चालविली जात होती. वैद्यकीय तपासणी शिबीर, रात्रशाळांसाठी कथाकथन आणि निबंध स्पर्धा आदी उपक्रम दरवर्षी संस्था राबविते. मुंबई विभागातील रात्रशाळेतून पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांला संस्थेतर्फे एक हजार एक रूपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येते. या शिवाय मोफत अल्पोपहार, स्टेशनरी, संगणक शिक्षण, दहावीच्या गरीब विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ देता यावा यासाठी आर्थिक मदत, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून प्रश्नसंच सोडवून घेणे, त्यांचे जादाचे वर्ग घेणे, शाळाबाह्य़ विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रोत्साहन देणे, क्रीडा महोत्सव, आजी-माजी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक संमेलन आदी उपक्रम शाळा आपली शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी राबविते. यामुळे गेली तीन वर्षे सातत्याने शाळेच्या निकालात सुधारणा झाली आहे. या वर्षी शाळेचा निकाल ८३ टक्के इतका होता. संमेलनाला उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांसाठी संपर्क – ९९६९४१८८९०