अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे एक जानेवारी रोजी व्दितीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय सहित्य अकादमीचा पुरस्कारप्राप्त युवा कवी प्रा. ऐश्वर्य पाटेकर यांची निवड करण्यात आल्याची माहिती परिषदेचे नवनाथ गायकर व तुकाराम धांडे यांनी दिली आहे.
परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस गायकर व धांडे यांच्यासह मिलींद पंडित, मु. ग. शिरसाट, शिवाजी क्षीरसागर, संजय कान्वह, रुपचंद डगळे, विद्या पाटील, प्रा. अविनाश कासार आदींसह असंख्य पदाधिकारी व साहित्यप्रेमी उपस्थित होते.
संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर खास अहिराणी भाषिक साहित्यिकांसाठी ‘अहिराणी काव्य स्पर्धा’ आयोजित करण्यात आल्याची माहिती परिषदेचे अहिराणी भाषा विभागप्रमुख रवींद्र पाटील यांनी दिली आहे. विषयाचे बंधन नसून २० रुपये प्रवेश शुल्क आहे. साहित्य २० डिसेंबपर्यंत नवनाथ गायकर, आहुर्ली, पो. सांजेगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक ४२२४०२ या पत्यावर पाठवावे. अधिक माहितीसाठी ९८८१३२९७०९ व ९७६३८२७७०८ या क्रमांकावर संपर्क साधावा. स्पर्धेचा निकाल व पुरस्कार वितरण या संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रथम ५०१ रूपये, द्वितीय ३०१, तृतीय २०१ रूपये आणि पाच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.