नृत्य, संगीत, वादन यांचा अनोखा मिलाफ असणारा बारावा शनिवारवाडा नृत्य महोत्सव उत्साहात संपन्न झाला. महोत्सवाचे उद्घाटन खासदार अनु अगा यांच्या हस्ते करण्यात आले. कथक नर्तिका अंजली पाटील यांनी सादर केलेली गणेशवंदना, शास्त्रीय गायिका वत्सला मेहेरा यांनी सादर केलेली ‘मौसे नैयना मिलायके’ व ‘दमा दम मस्त कलंदर’ या ठुमरी-दादरा आणि नृत्यविशारद आदिती मंगलदास व सहकाऱ्यांनी ‘अनचार्टेड सिज्’ हा कथक नृत्याविष्कार सादर केला. या वेळी महोत्सवाच्या अध्यक्षा सबिना संगवी, समन्वयक गायत्री पटवर्धन, पारूळ मेहता, मनिषा साठे, वर्षां चोरडिया, जयश्री शहाडे आदी उपस्थित होते.