अपंगांना सर्व प्रकारे साहाय्यता करण्याच्या दृष्टीने मीरा-भाईंदर महानगरपालिकेने ८० लाख रुपयांची तरतूद केली असून शासनाप्रमाणेच महापालिकादेखील अपंगांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबविणार आहे.
महापालिकेने २४ सप्टेंबरपासून अपंगांचे सर्वेक्षण आणि नोंदणी सुरू केली असून, त्यासाठी ३५ कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आहे.
पालिका मुख्यालयातील समाजकल्याण विभागातही अपंगांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, असे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी सांगितले. शहरात किमान दोन वर्षांचे वास्तव्य असलेल्या अपंगांची नोंद अपंगत्वाचे व दोन वर्ष निवासाचे पुरावे सादर करून नोंदणी करावी असे ते म्हणाले.