आंतरराष्ट्रीय चित्रकार प्रा. प्रफुल्ल सावंत, माजी प्राचार्य मुरलीधर रोकडे, व्यंगचित्रकार ज्ञानेश्वर बेलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे २ ते ४ मे या कालावधीत चित्रकार मुकुंद पापरीकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हार्मनी कलादालनात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. ४ मेपर्यंत सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत रसिकांसाठी हे प्रदर्शन खुले राहील. प्रदर्शनात एकूण ४० चित्रे ठेवण्यात येणार आहेत. प्रदर्शनास नाशिककरांनी भेट द्यावी असे आवाहन चित्रकार पापरीकर, प्रा. बाळ नगरकर, राजा पाटेकर यांनी केले आहे.