नाशिकचे मनसेचे आमदार नितीन भोसले यांनी इंदिरानगर येथील प्रिसिजन स्पोर्टस् क्लबच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शुटींग रेंजला भेट दिली. त्यांच्या हस्ते नेमबाजीच्या विविध स्पर्धामधील यशस्वी नेमबाजांचा सत्कार करण्यात आला.
मुंबई येथे अलीकडेच झालेल्या प्रबोधनकार ठाकरे स्पर्धेत क्लबचा मुख्य प्रशिक्षक अभय कांबळे ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ गटात उपविजेता ठरला. रसिका कोतवालने पिस्तूल गटात सुवर्ण तर प्रमोद वाडिलेने कांस्य पदक मिळविले. पुणे येथे झालेल्या पश्चिम विभागीय राष्ट्रीयपूर्व स्पर्धेत संचित गडकरीने रायफल गटात सुवर्ण पटकाविले. सोहम कुलथेनेही या गटात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाव्दारे पुणे येथे आयोजित आंतरशालेय राज्यस्तरीय फेरीमध्ये पिस्तूल गटात यशवंत मोहिते-पाटील याने कांस्य पदक पटकाविले. आंतरशालेय राष्ट्रीय स्पर्धेत ती सहभागी होणार आहे. दिल्ली येथे झालेल्या जी. व्ही. मावळणकर स्पर्धेत वैशाली पेखळेने उल्लेखनीय कामगिरी केल्याने ती राष्ट्रीय फेरीसाठी पात्र झाली. यशस्वी खेळाडूंना ज्येष्ठ क्रीडा मानसतज्ज्ञ भीष्मराज बाम यांचे मार्गदर्शन लाभले
भोसले यांनी क्लबच्या अत्याधुनिक सुविधांविषयी गौरवोद्गार काढत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी मनसे रोजगार स्वयंरोजगार आघाडीचे शहराध्यक्ष पराग शिंत्रे, नगरसेविका दीपिका कुलकर्णी, क्लबच्या संस्थापिका डॉ. शामा कुलकर्णी, निखील कुलकर्णी आणि केयूर कुलकर्णी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 6th Dec 2012 रोजी प्रकाशित
‘प्रिसिजन’ मध्ये नेमबाजांचा सत्कार
नाशिकचे मनसेचे आमदार नितीन भोसले यांनी इंदिरानगर येथील प्रिसिजन स्पोर्टस् क्लबच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शुटींग रेंजला भेट दिली. त्यांच्या हस्ते नेमबाजीच्या विविध स्पर्धामधील यशस्वी नेमबाजांचा सत्कार करण्यात आला.

First published on: 06-12-2012 at 02:44 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honor of archery contestants in prision