माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीमध्ये आयोजित ईग्नाईट २०१४ या दोन दिवशीय राष्ट्रीयस्तरीय कार्यशाळेचा समारोप बक्षीस वितरण कार्यक्रमाने करण्यात आला. याप्रसंगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे इंजिनिअरींग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विभागाचे अधिष्ठाता डॉ.जी.आर. बमनोटे, बुलढाणा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पांडुरंगदादा पाटील, संस्थाध्यक्ष ज्ञानेश्वर पु. पाटील, संत नगरीचे माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, प्राचार्य डॉ. सी . एम. जाधव, संयोजक प्रा.के.के.राजपूत, विद्यार्थी समन्वयक अभिजीत मारोडे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
विविध एकूण २१ इव्हेन्टमध्ये सुमारे चार हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामधून प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रोख बक्षीस, प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले. सर्किट डीबगींग-वैभव गासे बडनेरा तंत्रनिकेतन, ब्रेन व्हेव सी-क्विझ-मितांशु संत गजानन अभियांत्रिकी, लेथवार-मनोज यादव एम.जी.आय.अभियांत्रिकी महाविद्यालय, रोबो मड-लोचना चिंचोले शासकीय तंत्रनिकेतन अमरावती, रोबो अ‍ॅक्वा-प्रशांत थेरात- एस.एस.बी.अभियांत्रिकी भुसावळ, पोस्टर प्रेझेन्टेशन-गणेश बोरसे जळगाव खांदेश, रोबो सॉकर-अश्विनी संत वाशीम, गुंजन संत खामगाव, पेपरप्रेझेन्टेशन-श्रृती भंदरवार वांद्रे, मुंबई, रोशन हाडोळे दारापूर, निखली भंडारे-अनुराधा इंजिनिअर चिखली, योगिनी बाळापुरे-अकोला इंजिनिअर मंगेश वासनकार-धामनगाव रेल्वे, चेतन सोनवणे-गुलाबराव देवकर कॉलेज जळगाव, विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच बॉक्स क्रिकेटचा रोमांचक ठरलेला अंतिम सामना शासकीय तंत्रनिकेतन, वाशीम व माऊली ग्रुपच्या संघांमध्ये चांगलाच रंगला होता. अंतिमक्षणी यजमान माऊली संघाने विजय मिळवून जल्लोष साजरा केला. संगाबा अमरावती विद्यापीठाचे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता टेकचे डॉ.जी.आर. बमनोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पांडुरंगदादा पाटील, माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, संस्थाध्यक्ष ज्ञानेश्वरदादा पाटील, प्राचार्य डॉ.सी.एम. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.के.के. राजपूत यांनी थोडक्यात आढावा मांडला. संचालन प्रा. मंजुषा पाटील,  यांनी  तर आभार अभिजित मारोडे यांनी व्यक्त केले.