शहरातील बाळीवेशीत पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेसह अन्य दोन ठिकाणी घरफोडय़ा केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद झाल्याने त्याचा लाभ घेत पोलिसांनी तातडीने ही कारवाई केली.
संतोष संजय कांबळे (वय २१, रा. जय मल्हार चौक, एसटी बसस्थानकाजवळ, सोलापूर), शिवाजी ऊर्फ शिवलाल जीवन काळे (वय २१, रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर) व किरण शिवाजी काळे (वय १९, रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून ४० हजारांचा चोरीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
बाळीवेस येथे पहाटेच्या सुमारास पंजाब नॅशनल बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न उघडकीस आला होता. परंतु त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटय़ाचा चेहरा कैद झाला होता. जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंकदर नदाफ यांनी या गुन्ह्य़ाचा तातडीने छडा लावत सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील कैद झालेल्या चेहऱ्याचा शोध घेतला. यात संतोष संजय कांबळे हा अलगदपणे सापडला. पोलिसांकडील गुन्ह्य़ांच्या नोंदीनुसार तो सराईत घरफोडय़ा आहे. यापूर्वी त्याने बाळीवेस भागातीलच एका व्यापाऱ्याचा बंगला फोडून १७ लाखांचा किमती ऐवज लंपास केला होता. त्याच्याकडून पंजाब नॅशलन बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न करताना अंगात वापरलेले कपडे तसेच लोखंडी साहित्य जप्त करण्यात आले.
दरम्यान, बाळे येथे तुळशीदास नगरात राहणाऱ्या जालिंदर वाघमोडे यांची घरफोडी करून ४५ हजारांचा ऐवज लांबविण्यात आला होता. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचीही घरफोडी झाली होती. या दोन्ही गुन्ह्य़ांचा तपास फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील पथकाने करून शिवाजी ऊर्फ शिवलाल काळे व किरण काळे या दोघांना अटक केली.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jan 2013 रोजी प्रकाशित
बँक फोडण्याचा प्रयत्न करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे अटकेत
शहरातील बाळीवेशीत पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेसह अन्य दोन ठिकाणी घरफोडय़ा केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद झाल्याने त्याचा लाभ घेत पोलिसांनी तातडीने ही कारवाई केली. संतोष संजय कांबळे (वय २१, रा. जय मल्हार चौक, एसटी बसस्थानकाजवळ, सोलापूर), शिवाजी ऊर्फ शिवलाल जीवन काळे (वय २१, रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर) व किरण शिवाजी काळे (वय १९, रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून ४० हजारांचा चोरीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
First published on: 18-01-2013 at 09:26 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In solapur bank robber arrested as he caught by cctv camera